जवाहर नवोदय विद्यालय आणि प्रवेश परीक्षेच्या निकालाने कोऱ्हाळा जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केला आहे.
चि. अर्णव आनंद वानखेडे याची नवोदय विद्यालयासाठी भुसावळ येथे निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरले आहे.
अर्णव ला वर्गशिक्षक श्री.अनंता हिवरखेडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, मुख्याध्यापक श्री.सुधीर अळीकने सर, श्री. स्वप्नील अवचार सर, श्री, विजय चन्ने सर, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचं योगदान दिलं आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं हे फळं आहे. या निकालाने समाजात कोऱ्हाळा जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा उंचावली आहे. अर्णव ला या यशाबद्दल त्याला शुभेच्छा देत व त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सतीश वाणखेडे, मुक्ताईनगर
+91 80809 80507
satish02031997@gmail.com

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
