जळगाव शहरात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी विशेष मोहीम: Special campaign for revision of electoral rolls in Jalgaon city

जळगाव शहरात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम दि. २२ मार्च ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला असून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी, तहसीलदार शीतल राजपूत, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रूपाली काळे तसेच निवडणूक नायब तहसीलदार नवीन भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.

या मोहिमेंतर्गत शहरातील बीएलओमार्फत घरोघरी जाऊन मतदारांचे मॅपिंग, ब्लर फोटो दुरुस्ती, तसेच DSE संबंधित कामे करण्यात येत आहेत. नागरिकांना अचूक व अद्ययावत मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

या अनुषंगाने आझाद हिंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत चिस्तिया मस्जिद परिसरात नागरिकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये सुपरवायझर क्र. ३६ योगेश भालेराव तसेच बीएलओ महेंद्र पारधी (१५४), नितीन वंजारी (१५५), सुभाष पाटील (१५६), विलास पाटील (१५८), प्रभाकर खराटे (१६९), तोसिफ शेख (१४३), संजय सपकाळे (१४७), पराग चौधरी (१४९), हिंमतराव ढवळे (१४८), सुरेश न्हावी (१५९) आणि पांडुरंग रानावडे (१७१) आदी उपस्थित होते.
कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष फिरोज शेख, सचिव मोहम्मद नूर पठाण, खजिनदार मुदस्सर शेख तसेच नासिर मणियार आणि मेहमूद पिंजारी यांनी विशेष प्रयत्न केले.

नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या मतदार नोंदी अद्ययावत करण्यासाठी पुढाकार घेतला.

#state_election_commission #sthaniksamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!