जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पथसंचलन; बहुजन संघटनांचे एकत्रित शक्तिप्रदर्शन, शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात बहुजन व्हॉलंटियर फोर्स (बीव्हीएफ), बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या वतीने भव्य पथसंचलन काढून मानवंदना देण्यात आली. या पथसंचलनात शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पथसंचलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता बिग बाजार, खान्देश मॉल परिसरातून खान्देश प्रभारी बीव्हीएफ सुनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ही रॅली गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा मार्गे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.
यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यात राष्ट्रीय सेन संघाचे राष्ट्रीय सचिव राजकुमार गवळी, सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, टोकरे कोळी समाजाचे अशोक शिरसाटे, मुस्लिम बिरादरीचे शैफुल्लाभाई खान, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाचे देवराज वाडे, राष्ट्रीय पेन्शनर संघाचे दिलीप इंगळे, रविंद्र मोरे, देविदास पारधे तसेच राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या सखुबाई जाधव, शोभाताई भालेराव, प्रा. मिनाक्षी वाघमारे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांचा समावेश होता.
या पथसंचलनाचे संचालन बीव्हीएफचे राज्य प्रभारी प्रकाश इंगळे, बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सहसंयोजक सुमित्रा अहिरे तसेच जवान शुद्धोधन खंडारे, जवान गोविंदा इंगळे, जवान संजीव सोनवणे, जवान माया खंदारे, जवान उज्ज्वला इंगळे, जवान देवानंद निकम, जवान सुनिल देहाडे, जवान खुशाल सोनवणे, जवान राहुल सोनवणे आणि जवान बबलू पेंढारकर यांनी केले.
या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
