एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम; अनोळखी लिंक, वैयक्तिक माहिती, पासवर्ड आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याचे मार्गदर्शन.
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याचे उपाय तसेच सायबर गुन्हा घडल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. 
विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली. डिजिटल माध्यमांचा वापर करताना सावधगिरी आणि जबाबदारी बाळगण्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. बी. चव्हाण तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
