सायबर धोक्यांपासून सुरक्षिततेचा मंत्र; VIET College मध्ये जनजागृती सत्र
२०० हून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन
VIET College येथे २०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरुळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, संशयास्पद लिंक व कॉलपासून सावध राहण्याचे उपाय, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच सोशल मीडिया आणि इंटरनेटचा जबाबदारीने वापर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, अनोळखी व्यक्तींकडून येणारे कॉल, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खात्री करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद संकेतस्थळांवर शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले.
या सत्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत माहिती जाणून घेतली. या संवादातून विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदार वर्तनाचे महत्त्व समजले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
