🚨 जळगाव: तालुक्यातील निमखेडी गावात गुरुवारी (दि. १९ मार्च) दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर विळ्याने हल्ला करून तिची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव दिपाली नितीन सोनवणे (वय २८) असून त्या पती नितीन विजय सोनवणे (वय ३५) व तीन मुलांसह निमखेडी येथे राहत होत्या. नितीन सोनवणे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. गुरुवारी दुपारी वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या नितीन सोनवणे यांनी लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर आणि पोटावर वार केले. या हल्ल्यात दिपाली सोनवणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे तीन लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
