जळगाव: रमजान ईद निमित्त जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी शनिवार दि. २१ मार्च रोजी अत्यंत भक्तीभावात नमाज अदा केली. नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी येथील सुन्नी ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा करण्यात आली.
यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद भिलपूरा चे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली यांनी उपस्थित नमाजी बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत “ईद मुबारक” असा संदेश दिला. त्यांनी ट्रस्टच्या वर्षभरातील कामांचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती दिली. तसेच सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेत ईद साजरी करण्याचे आवाहन केले.
नमाजानंतर मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी खुतबा सादर केला, तर नमाज पठणाची पद्धत मौलाना नजमूल हक यांनी सांगितली. मौलाना झुबेर आलम यांनी सलातो-सलाम पठण केले. यावेळी देशाच्या शांतता, प्रगती व सर्वांच्या आरोग्यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
कार्यक्रमासाठी जळगाव महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास सुमारे २० हजार सुन्नी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना झुबेर आलम अशरफी, मौलाना खलील अहमद बरकाती, मौलाना अब्दुल मतीन, मौलाना अब्दुल हमीद, मुख्तार शाह, सय्यद जावेद, शाकीर चित्तलवाला, झरीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
