मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दररोज १४-१४ तास वीजबंदीचा सामना करावा लागत आहे. वाढीव लोडशेडिंगमुळे उन्हाळ्याच्या तीव्र झळा सहन करताना ग्रामस्थांचे हाल होत असून लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येबाबत शिवसेना (उ.बा.ठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. अभियंता आर. जी. तायडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात घिर्णी-उमाळी रोडवरील खंडोबा, चोपडे व भोपळे डीपीवरील ग्राहकांना नियमित बिल भरूनही सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत तब्बल १४ तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ पर्यायी व्यवस्था करून वाढीव लोडशेडिंग थांबवण्यात यावे. अन्यथा, तीन दिवसांत प्रश्न न सुटल्यास सोमवार, २३ मार्च रोजी बिर्ला रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर निंबाजी सपकाळ, विष्णू गव्हाळे, गोपाल चव्हाण, गणेश सोनवणे, विनोद चोपडे, महादेव बोपळे, जानराव सोनोने, वसंता गव्हाळे, प्रल्हाद चोपडे, दिनकर गव्हाळे, शंकर गव्हाळे, मंगलसिंह चव्हाण, कैलास पवार, गजानन ओंकार चव्हाण, समाधान गव्हाळे, प्रल्हाद भोपळे, विष्णू इंगळे, समाधान चोपडे, रामदास भोपळे, पांडुरंग भोपळे, गजानन चोपडे, श्रीराम चोपडे, वसंता चोपडे, राजू महाजन, तुळशीराम चोपडे, गोपाल राऊत आदींसह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
