मलकापूर :भिमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे दि. २० मार्च रोजी दुपारी १२ वाजता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या बैठकीत आगामी जयंती उत्सवाचे नियोजन, विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा तसेच समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची मांडणी करत समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी संयुक्त जयंतीचे अध्यक्ष अँड. कुणाल वानखेडे यांनी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या या संयुक्त जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सदर जयंती उत्सव ‘समतेचे निळे वादळ’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांतजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार असून, विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी धम्मदास वानखेडे, जी. एस. मोहड, पुंडलीकराव मोरे, अशोकभाऊ जाधव, शेषराव कडासे, जयराज तायडे, संदीप वानखेडे, अँड. सनी मगरे, डॉ. ढाले, उल्हास शेगोकार, प्रा. योगेश सरदार, डॉ. अशोक सुरडकर, सुरेश इंगळे, समाधान सुरवाडे, किशोर राऊत, विजय वानखेडे, अशोक तायडे, राजेश विठ्ठल इंगळे, भीकाजी तायडे, सुरेश तायडे सर, विजयकांत मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहनभाऊ खराटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीपभाऊ इंगळे, विजय सोनोवने, सुरेश इंगळे व सुरेंद्र सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
