मलकापूर : अनुराबाद येथील १९ वर्षीय धनश्री नथ्यू चौधरी ही मलकापूर येथील कोलते कॉलेजला २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गेली होती. मात्र, नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
धनश्रीचा वडील रोहीत तथ्यू चौधरी (वय २१ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे की, मुलीचा शोध शहरातील विविध ठिकाणी, कॉलेजमध्ये आणि नातेवाईकांकडे घेतला असता ती सापडली नाही.
हरवलेल्या मुलीचे वर्णन अशाप्रकारे आहे – रंग गोरा, उंची अंदाजे ५.२ फुट, बांधा सळपातळ, डोळ्यांना चष्मा, अंगावर कोलते कॉलेजचा पांढर्या रंगाचा शर्ट व काळ्या पॅन्ट.
मलकापूर शहर पोलीस स्टेशनकडून आढळलेल्या व्यक्तींना धनश्रीची माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेडगे करीत आहेत.
#girlmissing #malkapur #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
