ओमच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
अनेर नदीत स्नानासाठी उतरलेल्या चार अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवताना १४ वर्षीय उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील याने केलेल्या धाडसामुळे तो गावात ‘देवदूत’ म्हणून ओळखला जात आहे.
घटनेवेळी या चारही मुले (वय १६) पोहता येत नसल्यामुळे बुडत होत्या. तेव्हा नदीतून जात असलेल्या उमेशने धाडसपूर्वक डोहात उडी घेतली आणि सर्व चार मुलांचे प्राण वाचवले.
ओम पाटील गावातील विकास विद्यालयात ८वीमध्ये शिकत असून, गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई शेतमजुरी करतात. त्यांच्या घराचे पत्र्याचे आहे, तर मोठा मुलगा ११वीमध्ये शिक्षण घेत आहे.
ओमच्या या धाडसाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अशोक जैन यांच्या हस्ते त्याचे गौरवही करण्यात येणार आहे.
अध्यक्ष अशोक जैन म्हणाले, “संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी जैन इरिगेशन अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे.”
#braveom #jalgaon #jainerrigation #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
