बस स्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील पोथ चोरी; पोलीस अनुपस्थित : chain snatching at bus stand

मलकापूर बस स्थानक परिसरात खामगाव येथे जात असलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या गळ्यातील पोत चोरट्याने लंपास केल्याची घटना आज दि. २३ मार्च रोजी सकाळी ११.३० दरम्यान घडली. मलकापूर परिसरात गत आठ महिन्यात २० ते २५ चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी राजेश सुधाकर मांडवाले हे आपल्या पत्नी स्मिता व मुलांना खामगाव येथे नातेवाईकांकडे पाठविण्यासाठी मलकापूर बस स्थानक येथे आले होते. दरम्यान राळेगाव ला जाणारी बस क्रमांक एम एच १४ एम पी ९२२३ या बस मध्ये चढत असताना पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरीला गेल्याचे समजले. तेव्हा आरडा ओरड केला असता काही समजण्याआधीच चोरटा त्या ठिकाणावरून लंपास झाला.

बस स्थानक परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी कार्यरत असणे आवश्यक असताना त्या ठिकाणी पोलीस कर्तव्यावर नव्हते तर परिसरात प्रवाशांची वर्दळ चांगलीच असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आवश्यक असताना परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नाही. त्यामुळे अशा चोरीच्या घटना होण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहनच मिळत आहे. मलकापूर शहरासह तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. एवढ्या घटना होत असताना सुद्धा प्रशासन या विषयाची दखल का घेत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासोबत संपर्क साधला असता अपुऱ्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त व व्यवस्था कशी करावी असा प्रश्न आमच्या समोर असतो. तरी आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील राहून योग्य तो तपास करीत आहे. असे सांगितले.
फिर्यादी राजेश सुधाकर मंडवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

#chain_snatching #sthaniksamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!