जळगाव – शहरातील जैनाबाद परिसरामध्ये रविवारी दि. २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सुमारास केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणातून संशयित आरोपीने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. उपचारादरम्यान या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नितीन नाना काळे (वय ३५, रा.जैनाबाद, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ-बहीण यांच्यासह शहरात राहत होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या चार दिवसांपासून सुट्टीच्या कारणाने तो जळगावमध्ये आलेला होता. रविवारी २२ मार्च रोजी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने पाचशे रुपये मागितले. मात्र पाचशे रुपये नाहीत म्हणून त्याने नकार दिला.याचा संशयित आरोपीला राग आला.
त्याने धारदार शास्त्राने नितीन काळे याच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी नितीन काळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवारी दि. २३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. यापूर्वी देखील संशयित तरुणाने वाद करत डोक्यात बिअरची बाटली फुटली होती मात्र दोन दिवसातच पोलिसांनी त्याला सोडून दिलाचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी पैसे घेऊन यापूर्वी वाद झाल्यानंतर संशयित तरुणाला सोडून दिल्याचा गंभीर आरोप देखील नातविकांनी केला आहे. दरम्यान किरकोळ कारणाने झालेल्या खुनामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले असून शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाची नोंद घेण्याचे काम सुरू होते
#murder_at_jalgaon #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
