मलकापूरमध्ये अवैध देहव्यापाराविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; एपीआय यशोदा कणसे यांच्या नेतृत्वाखाली कुंटणखान्यावर धडक कारवाई.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अवैध देहव्यापाराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका हायप्रोफाइल कुंटणखान्यावर धाड टाकत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेतील “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे आणि त्यांच्या पथकाने २५ मे २०२६ रोजी मलकापूर शहरातील वाकोडी शिवारातील महावीर नगर परिसरात ही धडक कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका निवासी घरावर अचानक छापा टाकला. संबंधित ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने अनैतिक देहव्यापार करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत घराला वेढा घातला आणि छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना अत्यंत धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. घरामध्ये एक ग्राहक आणि दोन पीडित महिला आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपीला ताब्यात घेतले. तसेच पीडित महिलांची सुटका करून त्यांना संरक्षण देण्यात आले.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी देहव्यापारातून मिळालेली रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण सुमारे ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील जंबूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय यशोदा कणसे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहरे, सतीश हाताळकर, विजय वाखळे, समाधान टेकाळे, अमोल बनारे, महेश सनमाळे, वैशव निमाळकर, महिला पोलीस अंमलदार कोमल झांबे, दिवाली चव्हाण आदींचा सहभाग होता. विशेष म्हणजे या मोहिमेत परिविक्षाधीन डीवायएसपी सागर कदम यांनीदेखील सहभाग घेतला.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

सचिन सरदार हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. बातम्या आणि जाहिरातींकरिता आपण संपर्क करू शकतात –
📱9309831933
Email- ssbuisnes97@gmail.com
