कासारे येथील खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रणव गांगुर्डे MHT-CET 2026 मध्ये 99.42 पर्सेंटाइलसह यशस्वी. कोणत्याही खासगी क्लासशिवाय मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक.
प्रतापपूर येथील कु. प्रणव प्रशांत गांगुर्डे याने MAH-MHT CET (PCM Group) 2026 परीक्षेत तब्बल 99.4197952 पर्सेंटाइल (99.42 पर्सेंटाइल) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे प्रतापपूर गावाचे नाव तालुका व जिल्हा पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
प्रणव हा कासारे येथील खान्देश गांधी बाळूभाई मेहता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याने इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण याच विद्यालयात पूर्ण केले आहे. अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या प्रणवने कोणत्याही खासगी क्लासचा आधार न घेता केवळ नियमित शिक्षण, स्वयंअध्ययन, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
MHT-CET परीक्षेत प्रणवने भौतिकशास्त्र (Physics) मध्ये 99.3481 पर्सेंटाइल, रसायनशास्त्र (Chemistry) मध्ये 96.8737 पर्सेंटाइल आणि गणित (Mathematics) मध्ये 99.6109 पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे प्रतापपूर गावाच्या इतिहासात JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये एवढे उल्लेखनीय यश मिळवणारा प्रणव हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.
प्रणवच्या या यशामागे त्याचे आई-वडील यांचे कष्ट आणि प्रोत्साहन तर आहेच, परंतु त्याच्या आजोबांची कडक शिस्त, शिक्षणाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्यासाला दिलेले प्राधान्य यांचाही मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजोबांच्या संस्कारांमुळे आणि मार्गदर्शनामुळे प्रणवला सातत्याने प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच तो यशाचे हे शिखर गाठू शकला.
प्रणवच्या या यशाबद्दल कासारे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रतापपूर गावाचे माजी सरपंच श्री धनराज गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री हर्षल ठाकरे, श्री सुरेश गांगुर्डे, श्री पराग गांगुर्डे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रणव व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रणवच्या या यशामुळे प्रतापपूर गावातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून, जिद्द, मेहनत आणि स्वयंअध्ययनाच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
