जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजिटल भविष्य, 5G तंत्रज्ञान आणि उपग्रह संप्रेषण विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी मते मांडली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन साजरा, “उपग्रह संप्रेषण व डिजिटल भविष्यावर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
गोदावरी फाउंडेशन अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १७ मे २०२६ रोजी जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग तसेच टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाची थीम “डिजिटल लाइफ लाईन : स्ट्रेंगथनिंग रेसिलियन्स इन ए कनेक्टेड वर्ल्ड” अशी होती. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी आणि विभाग प्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दूरसंचार क्षेत्राचा इतिहास, 5G तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल भविष्य यांसारख्या विषयांवर प्रभावी मते मांडली. मार्गेश वाघ, ऋतुजा ठेंग, यश धनगर, पावबा पाटील, प्राजक्ता पाटील, तुळजा महाजन आणि प्रणव थोरात यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भविष्यासंदर्भात सखोल विचार व्यक्त केले.
डॉ. हेमंत इंगळे यांनी दूरसंचार हे आधुनिक डिजिटल युगाचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे सांगत शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग क्षेत्रातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना 5G, वायरलेस कम्युनिकेशन, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी आणि IoT क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आर. व्ही. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कीर्ती बोरोले यांनी केले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
