जळगाव जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अर्ज, वेबिनार आणि त्रुटीपूर्तता मोहिमेचे आयोजन; विद्यार्थ्यांना परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन.
राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यालयामार्फत २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या काळात अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रकरणांची तालुका व महाविद्यालयनिहाय माहिती समान संधी केंद्रांच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे.
तसेच नीट , गेट यांसारख्या सीईटी परीक्षांना बसणारे विद्यार्थी, डिप्लोमा व डी-फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थी यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्रांच्या माध्यमातून वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार आहे.
सर्व अर्ज समान संधी केंद्रांच्या माध्यमातून स्वीकारून त्यावर तात्काळ कार्यवाही करत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन समितीने केले आहे.
याशिवाय जिल्हा स्तरावर ३० जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत त्रुटीपूर्तता मोहीमही राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
