उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर आयएमएचा राज्यव्यापी बंद स्थगित

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशनने २० जुलै रोजीचा राज्यव्यापी २४ तासांचा बंद तात्पुरता स्थगित केला; राज्यभर सर्व वैद्यकीय सेवा नियमित सुरू राहणार.

आयएमए जळगाव शाखेची माहिती; उच्च न्यायालयाच्या आवाहनाचा सन्मान राखत राज्यव्यापी बंद मागे. सोमवार, २० जुलै रोजी सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत.

 इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तर्फे सोमवार, दि. २० जुलै रोजी पुकारण्यात आलेला २४ तासांचा राज्यव्यापी बंद उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. याबाबत आयएमए जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले आणि सचिव डॉ. पंकज शाह यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी घेतली. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली. तसेच राज्यव्यापी बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन न्यायालयाने आयएमएला केले होते.

उच्च न्यायालयाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आयएमएने राज्यव्यापी बंद स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार, दि. २० जुलै रोजी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नियमितपणे सुरू राहतील, असे आयएमए जळगाव शाखेने स्पष्ट केले आहे.

रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि न्यायालयाच्या आवाहनाचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!