पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदाबाबत महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरांचा निर्णय. प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने निकाल लागल्याचा दावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीइएस ) संदर्भातील प्रदीर्घ कायदेशीर वादाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निर्णय दिल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून मान्यता कायम करण्यात आली आहे.
या प्रकरणात गेल्या अनेक काळापासून कायदेशीर संघर्ष सुरू होता. ॲड. प्रकाश आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी होऊ नयेत, यासाठी एस. पी. गायकवाड यांच्यासह अनेकांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले आणि त्यासाठी अनेक आघाड्याही उभारल्या. मात्र, ही संपूर्ण लढाई न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रियेतून पुढे गेली आणि लढा जिंकला.विविध आक्षेप आणि वादांनंतर झालेल्या सुनावणीत चॅरिटी कमिशनरांनी संबंधित बाबींवर निर्णय दिला आहे.
या निर्णयानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे हे दोघेही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी म्हणून कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या निर्णयाचे समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून, हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीच्या वारशाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
