जळगावसह देशभर ब्रह्माकुमारीजच्या ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान’ला प्रारंभ. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमधून जनजागृती केली जाणार.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ “१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. दि. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभर आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष अभियानातून विकसित, निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
व्यसनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, वाढता कौटुंबिक तणाव, आर्थिक नुकसान आणि युवकांच्या भवितव्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन हे अभियान राबविण्यात येत आहे. राजयोग ध्यान हे आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य आणि दृढ इच्छाशक्ती निर्माण करणारी प्रभावी जीवनशैली असल्याचे मेडिकल प्रभाग, माऊंट आबूचे अध्यक्ष डॉ. बनारसी शहा यांनी सांगितले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र एकत्रितपणे कार्य करणार असून, राज्यातील विविध सेवाकेंद्रांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, संस्था तसेच विविध माध्यमांद्वारे व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माऊंट आबूचे राज्य माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी दिली.
ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगतर्फे सर्व शैक्षणिक संस्था, उद्योग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच नागरिकांनी या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होऊन व्यसनमुक्त, निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन स्थानिक सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी केले आहे

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
