वरणगाव महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त व्याख्यान संपन्न 

वरणगाव येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी संयुक्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि सामाजिक न्याय, स्वराज्य व राष्ट्रप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने वरणगाव महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

स्थानिक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त संयुक्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्तेपदी डॉ. अनिल पाटील होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. नितीन इंगळे उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात प्रमुख वक्त्यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा वेध घेतला.

लोकमान्य टिळकांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” हे क्रांतिकारी मत आणि अण्णा भाऊ साठेंचे “जग बदलायचं असेल, तर आधी स्वतःच्या मनातील भिंती पाडा!” तसेच “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे” हे सामाजिक विषमतेवर प्रहार करणारे विचार आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. एकाने सामाजिक ऐक्य आणि स्वराज्य यांची सांगड घातली तर दुसऱ्याने स्वराज्याला सामाजिक न्यायाची जोड दिली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल शिंदे, उपप्राचार्य डॉ. अशोक चित्ते, प्रा. अजित कालवले, प्रा. मनिषा इंगळे, प्रा. विकास उंबरकर, प्रा. चेतन पाटील प्रा. गजाजन भुसारी आणि महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक (OS) श्री. तुकाराम गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल जोहरे, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमराज मेटकर आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रजनी इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभारप्रदर्शन प्रा. राहुल जोहरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!