निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी-बारावीतील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक संघाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ शुक्रवार (दि. ३१ जुलै) रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मिताली पाटील व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या शितल अजलसोंडे या विद्यार्थिनींचा निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीराताई देशमुख यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवर पालकांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या मीराताई देशमुख यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. तसेच दहावी-बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, विशेषतः स्कुटीवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि मोबाईलचा वापर केवळ विधायक व शैक्षणिक कामांसाठीच करावा, असे मार्गदर्शन केले.
यावेळी स्कूल कमिटीचे संचालक विवेक बोंडे, सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष रवी भोगे.,पत्रकार राजीव बोरसे तसेच सत्कारमूर्ती विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणप्रेमी काशिनाथ शेलोडे यांनी मुख्याध्यापक पी. टी. बोरोले यांच्या अध्यक्षीय भाषणादरम्यान शिक्षक-पालक संघाच्या वतीने शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्याची सूचना मांडली.
कार्यक्रमास पालक संघाचे उपाध्यक्ष विलास महाले, चेअरमन मोहन भगाळे, सुरेश चौधरी, विवेक बोंडे, हरीश नेहते, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, शिवाजी पाटील, वाल्मीक पवार, काशिनाथ शेलोडे, सय्यद खाटीक, शेख हबीब, भीमा कुरे, नितीन महाले, गोपनीय शाखेचे अमोल वाघ.,संतोष कटोले यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. सांबरे व भोगे सर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सूर्यवंशी सर यांनी केले.

कृणाल तायडे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
मो. क्र. +91 86002 97169,
ईमेल – krunaltayade1991@gmail.com
