अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे शिक्षक संवाद सभा; पेन्शन, रिक्त पदे व सेवा सुरक्षेवर चर्चा.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवार डॉ. प्रशांत विघे यांच्या दर्यापूर तालुका प्रचारदौऱ्यादरम्यान तक्षशिला महाविद्यालय येथे शिक्षक संवाद व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या सेवा-सुरक्षा, पेन्शन, रिक्त पदे, पदोन्नती, अनुदान, पदमान्यता, शैक्षणिक स्वायत्तता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत हरणे होते. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर यावले, प्रा. दीपक राऊत, रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. वर्षा मोरशे, तक्षशिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घोटकर, असदपूर मुख्याध्यापक डाखोरे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा कर्मचारी नसून समाजाच्या पुढील पिढीचे भविष्य घडविणारा राष्ट्रनिर्माता आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक होणे आवश्यक आहे.
पुढे डॉ. प्रशांत विघे म्हणाले की,पेन्शनच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी जुनी पेन्शन, NPS व UPS संदर्भात स्पष्ट व न्याय्य धोरणाची गरज व्यक्त केली. दर्यापूर नगर परिषदेमध्ये काही कर्मचाऱ्यांची NPS खाती अद्याप उघडलेली नसणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, पदोन्नतीतील विलंब दूर करणे आणि शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामाचा भार कमी करण्याची मागणी केली.
प्राचार्य डॉ. यशवंत हरणे म्हणाले, “शिक्षकांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यासाठी डॉ. प्रशांत विघे यांच्यासारख्या सक्षम, अभ्यासू आणि संघर्षशील प्रतिनिधित्वाची गरज आहे.” शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला दर्यापूर तालुक्यातील शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
