अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड शेअर न करणे यासह सुरक्षित डिजिटल वापराबाबत साडेचारशे विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीचे धडे.
Quick Heal Foundationच्या वतीने ज्ञानप्रकाश शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृष्णा पांडुरे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष लाईव्ह हॅकिंग डेमो सादर करून विविध सायबर धोक्यांची माहिती दिली.
लाईव्ह प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फिशिंग लिंक, बनावट वेबसाइट, पासवर्डची सुरक्षितता, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर हल्ले कोणत्या प्रकारे होऊ शकतात, याची जाणीव करून देण्यात आली.
‘अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, OTP व पासवर्ड कोणालाही सांगू नका आणि डिजिटल जगात नेहमी सतर्क राहा,’ असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
