भुसावळ तालुक्यातील एका विवाहितेचा एक लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी (२१ मार्च) दुपारी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रिता मुकेश सुतार यांचा विवाह २०१२ मध्ये रावेर तालुक्यातील मोरगाव येथील मुकेश गजानन सुतार यांच्याशी पारंपरिक पद्धतीने झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असताना काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून छळास सुरुवात झाली.
तक्रारीनुसार, पती मुकेश सुतार हा वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. त्यानंतर सासरचे इतर सदस्यही त्याला साथ देत होते. “माहेरून १ लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत विवाहितेवर मानसिक व शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या छळाला कंटाळून विवाहितेने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पती मुकेश गजानन सुतार, चुलत दीर ललित हेमराज सुतार, हर्षल निवृत्ती सुतार, चुलत सासू दुर्गाबाई हेमराज सुतार, चुलत सासरे हेमराज बाबुराव सुतार (सर्व रा. मोरगाव, ता. रावेर) तसेच आते सासू पद्माबाई श्रीधर रुले (रा. साकळी, ता. यावल) अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी करीत आहेत.
#harassment_of_woman

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
