राज्यातील ५ हजार प्राध्यापक भरतीला अखेर गती; सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होणार: Recruitment of Processors in Aided College in Maharashtra

 

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सुमारे ५ हजार १२ पदांच्या भरतीस अखेर मान्यता मिळाली असून, ही प्रक्रिया पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या संख्येचा आणि रिक्त पदांचा सविस्तर आढावा घेत भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

प्रत्येक महाविद्यालयाकडून रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली होती. संबंधित विभागीय सहसंचालक कार्यालयांनी ही माहिती संकलित करून उच्च शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. त्यानुसार, विषयानुसार व महाविद्यालयनिहाय पदांची संख्या निश्चित करून भरती केली जाणार आहे.

दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै-ऑगस्ट महिन्यांदरम्यान भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी रोस्टर तपासणी, पदांची अंतिम मंजुरी आणि मुलाखतींचे वेळापत्रक लवकरच निश्चित केले जाणार आहे.

या भरतीमुळे राज्यातील महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, दीर्घकाळापासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांसाठीही ही मोठी संधी ठरणार आहे.

उच्च शिक्षण विभागाने सर्व संबंधित संस्थांना प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, प्रलंबित प्रस्तावांवर सातत्याने पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात लवकरच सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!