कोऱ्हाळा येथे काटेरी झुडपात जिवंत अर्भक आढळले; जादूटोण्याचा संशय, पोलिस तपास सुरू

कोऱ्हाळा येथे काटेरी झुडपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जादूटोण्याचा संशय, पोलिस तपास सुरू.

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) — कोहळा गावात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, काटेरी झुडपात जिवंत अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अर्भकाला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

📍 घटना कशी उघडकीस आली?

कोहळा गावातील एका शेताच्या बांधालगत असलेल्या काटेरी झुडपात एक दिवसाचे अर्भक टाकून दिल्याची माहिती स्थानिक पोलिस पाटलांनी कुऱ्हा दूरक्षेत्र पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार अशोक जाधव, कॉन्स्टेबल प्रवीण जाधव आणि श्रावण भिल्ल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

🚑 उपचारासाठी रुग्णालयात हलविणे

पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन प्रथम कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अर्भकाची प्रकृती लक्षात घेऊन जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

⚠️ जादूटोण्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, अर्भक अंदाजे सात महिन्यांचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गर्भपात करून अर्भकाला जिवंत अवस्थेत झुडपात टाकण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्भकाच्या ओठांवर जखमा असून डोक्यावर त्रिकोणी स्वरूपाची जखम आढळल्याने जादूटोण्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

😢 हृदयद्रावक दृश्य

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना काटेरी झुडपात अडकलेले, अपूर्ण वाढ झालेले स्त्री जातीचे अर्भक अत्यंत वाईट अवस्थेत आढळले. अर्भकाच्या अंगावर सर्वत्र काटे रुतलेले होते तसेच शरीरावर जखमा आणि ओरखडे दिसत होते. अर्भकाच्या तोंडातून रडण्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले.

🔍 पुढील कारवाई

या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

सतीश वानखेडे, मुक्ताईनगर 

+91 80809 80507

satish02031997@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!