उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा प्लेसमेंटमध्ये यश; १४ विद्यार्थ्यांना लेन्सकार्टमध्ये वार्षिक ३ लाखांचे पॅकेज.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत व्यवस्थापन प्रशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन लिमिटेड, मुंबई यांच्यातर्फे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ही मुलाखत १८ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात पार पडली.
या परिसर मुलाखतीत विद्यापीठातील एकूण २५ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख रुपयांचे वेतन देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेजस पाटील, ओम जावरे, दिव्या देवरे, दिया पंजाबी, विवेक पाटील, साक्षी पवार, केतन राठोर, रिटा भांडारकर, तुषार निकम, मयुर पाटील, मनिष चौधरी, रोहित घोडके, केतन रविंद्र पाटील आणि चौताली बारी यांचा समावेश आहे.
या मुलाखतीसाठी कंपनीचे प्रतिनिधी जतीनकुमार यादव आणि विशाल शर्मा उपस्थित होते. परिसर मुलाखतीचे संपूर्ण नियोजन केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. उज्वल पाटील, उपसमन्वयक प्रा. रामेश्वर चव्हाण तसेच प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
