अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने जळगावातील शेतकरी सायबर फसवणुकीचा बळी. मोबाईल बँकिंग सुरू करून ६.८० लाख रुपये काढल्याचा आरोप.
मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून ६ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र पाटील (वय ३५, रा. कोल्हे नगर, जळगाव) यांच्या मोबाईलवर १६ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० ते रात्री १०.२० या कालावधीत एका अनोळखी क्रमांकावरून लिंक पाठविण्यात आली होती.
फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तीने लिंकच्या माध्यमातून फिर्यादीच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे मोबाईल बँकिंग सुरू करून त्यांच्या खात्यातून परस्पर ऑनलाईन व्यवहाराद्वारे ६ लाख ८० हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
