जळगावच्या आशीष सपकाळे यांना तेजस सेवा प्रतिष्ठानकडून राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार २०२६’ प्रदान

संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगावचे आशीष उत्तमराव सपकाळे यांना तेजस सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्याचा गौरव! सामाजिक जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी आशीष सपकाळे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर.

संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव येथील आशीष उत्तमराव सपकाळे यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सुधीर तांबे , डॉ. मुकुंद भरसकाके, संघराज रुपवते तसेच आमदार डॉ. किरण लहामते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

संविधान मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक जनजागृती, विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आशीष सपकाळे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशीष सपकाळे यांनी हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील नागरिक, सहकारी कार्यकर्ते आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. तसेच भविष्यात सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या पुरस्काराबद्दल सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आशीष सपकाळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!