एरंडोलच्या रा.ति. काबरे विद्यालयाने दहावीच्या निकालात उज्ज्वल यश संपादन करत ८१.१० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
एरंडोल येथील रा.ति. काबरे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ८१.१० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण २५४ विद्यार्थ्यांपैकी २०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. छायेश्वरी झगडू निकम हिने ९२.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. समृद्धी ज्ञानेश्वर पाटील हिने ९१.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. पूर्वी हेमंत धामणे हिने ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे, सचिव राजूभाऊ मणियार, सहसचिव धिरजभाऊ काबरे, शाळेचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला, संस्थेचे सदस्य सतीशभाऊ परदेशी, परेश बिर्ला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. राठी सर, उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके सर, पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यालयाच्या निकालामुळे पालक व परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
