अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या परीक्षेसाठी जळगाव शहरात ३२ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आदेशानुसार, परीक्षा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी व कर्मचारी, पोलीस तसेच होमगार्ड यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
तसेच सर्व परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
