मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची अर्ज भरणी प्रक्रिया सुरू

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या वतीने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत जनजागृती व अर्ज भरणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मत्स्यव्यवसायिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील विविध मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले असून मत्स्यव्यवसायिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (ता.), जळगाव कार्यालयामार्फत २६ व २७ जून २०२६ रोजी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना विशेष मोहिमेअंतर्गत मत्स्यव्यवसायिकांसाठी जनजागृती व अर्ज भरणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

ही शिबिरे पाचोरा तालुक्यातील विविध मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये घेण्यात आली. यामध्ये हिवरामाता मच्छीमार सहकारी संस्था (खडकदेवळा), बिजासनीमाता मच्छीमार सहकारी संस्था (वाघुलखेडा), जोगमाया माता मच्छीमार सहकारी संस्था (वेरुळी बु.) तसेच बहुळामाई मच्छीमार सहकारी संस्था (वेरुळी) येथे शिबिरे पार पडली.

या शिबिरांमध्ये मत्स्यव्यवसायिकांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, ई-श्रम कार्ड, GAIS तसेच NFDP अंतर्गत नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांकडून KCC योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांनी उपस्थित मच्छीमारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिरांना संबंधित संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने मत्स्यव्यवसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!