भोला बापूजी सैंदाणे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी; पक्ष नेतृत्वाकडून नियुक्तीपत्र प्रदान.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी धुळे जिल्ह्यातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते भोला बापूजी सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया ताई सुळे, विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील, प्रदेश सरचिटणीस रोहित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, दि. ३० रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भोला सैंदाणे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले युवा नेतृत्व असून गेल्या १५ वर्षांपासून ते राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांनी कायम एकनिष्ठ राहून काम केले आहे. सन २००९ मध्ये शाखाध्यक्ष पदापासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थी, युवक आणि जिल्हा पातळीवरील विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप पाडली आहे.

जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रम, शेतकरी प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
नियुक्तीपत्र स्वीकारताना भोला सैंदाणे यांनी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांना विश्वास दिला की, पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास कधीही तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“दिलेल्या संधीचं सोनं करेल”
यावेळी बोलताना भोला सैंदाणे म्हणाले, “पक्षाने दिलेल्या संधीचं मी निश्चितच सोनं करेल. माझ्यावर वरिष्ठ नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहीन. महाराष्ट्रातील युवक संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी नेहमीच गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार केला आहे. त्याच विचारधारेने पुढील काळात कार्य करत राहीन.”
नियुक्तीपत्र प्रदान प्रसंगी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे, युवक प्रदेश सचिव अॅड. अक्षय बेंद्रे, विद्यार्थी संघटनेचे नेते कुंदन भैया, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पाटील, प्रदेश सचिव गोलू भैय्या राजपूत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोला बापूजी सैंदाणे यांच्या निवडीमुळे धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
