सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जळगावात विविध संघटनांचे आंदोलन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांचे आवाहन.
जंतर मंतर नवी दिल्ली या ठिकाणी गेल्या वीस दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा समाजसेवी सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक संस्था तथा संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै, 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहे… नीट परीक्षेमध्ये प्रचंड घोटाळा होऊन जवळपास 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन संपवून आत्महत्या केल्या आहेत. या हत्यांना जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे.पण निर्ढावलेल्या आणि उन्मत्त झालेल्या केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा न घेता उपोषणकर्त्या सोनम वांगचूक यांच्या जीवाशी खेळ खेळला आहे.
या कृतीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात होत आहे.सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि उपोषणाला प्रचंड पाठिंबा मिळत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. जर उद्या त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. हा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी जळगाव जिल्ह्यातील तमाम राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक संघटनांनी आपले उत्तरदायित्व देण्यासाठी मोठ्या संख्येने या निदर्शने -आंदोलनाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन संविधान सन्मान संमेलनाचे आयोजक आयु.मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
