जळगाव जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालयामार्फत मधपाळांना सुवर्णसंधी! ११,००० रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी. जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे आणि यशस्वी मधपाळांचा गौरव करणे हा या पुरस्कार योजनेचा उद्देश आहे.
गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये एक पुरस्कार विशेषतः महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पुरस्कारांची रक्कम प्रथम ११,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये अशी आहे. जागतिक मधमाशा दिनाचे औचित्य साधून २० मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावरून किंवा जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालयातून नामांकन अर्ज प्राप्त करावा. पूर्ण भरलेले अर्ज ४ मे २०२६ पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव (दूरध्वनी : ०२५७-२२५४४२८ / ९१६६५३८१०२८) किंवा संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी : ०२१६८-२६०२६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
