अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून उद्योजकतेला नवे बळ; डिजिटल सुविधांचा विस्तार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे सुरू करण्यात आलेल्या डिजिटल बाजारपेठ आणि प्रशिक्षण उपक्रमांची झलक.

उद्योजकांनो, आता आपली उत्पादने ऑनलाइन विका! अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बिझनेस प्रमोशन सुविधेची सविस्तर माहिती आणि डिजिटल प्रशिक्षणाबाबत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य पुरविण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यासाठी आधुनिक डिजिटल सुविधा व प्रशिक्षण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवरील Business Promotion (Marketing Tab) या सुविधेद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत व संपर्क तपशील अपलोड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंदणी पूर्ण झाली असून स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ मिळत आहे. यामुळे “लोकल ते ग्लोबल” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात आहे.
लाभार्थ्यांना व्यवसाय कौशल्ये वाढवण्यासाठी वेबिनार, YouTube व पॉडकास्टच्या माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा व आर्थिक नियोजन याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांनाही या उपक्रमांचा मोठा फायदा होत आहे.

याशिवाय DigiLocker सेवेमुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सोपी व वेगवान झाली आहे. भविष्यात Payment Gateway, तसेच MAHA-ID आणि UIDAI एकत्रीकरण करण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.

या सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ मिळत असून, अधिकाधिक लाभार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!