ॲड. दर्शन भरत देशमुख यांची जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड

जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भरघोस विजय मिळवत ॲड. दर्शन भरत देशमुख यांची अध्यक्षपदी निवड; विधी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

विधी क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या ॲड. दर्शन भरत देशमुख यांची जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव.

जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. दर्शन भरत देशमुख यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत अध्यक्षपदावर आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या विजयानंतर जिल्ह्यातील विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सहकारी वकील, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ॲड. दर्शन देशमुख हे वकिली व्यवसायात अभ्यासू, निष्ठावान आणि समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय योगदान दिल्याने त्यांची एक संवेदनशील आणि समाजाभिमुख वकील म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना ॲड. दर्शन देशमुख यांनी हा विजय केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण वकील बांधवांचा असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय ॲड. भरत देशमुख (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र अँड बार कौन्सिल ऑफ इंडिया), ज्येष्ठ व कनिष्ठ वकील, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अडावदकर परिवार यांच्या मोलाच्या सहकार्याला दिले.

“माझ्यावर विश्वास ठेवून साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. हा विजय माझा नसून आपल्या सर्वांचा आहे. जिल्हा वकील संघाच्या माध्यमातून वकील बांधवांच्या हितासाठी, संघटनेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे,” असे ॲड. दर्शन देशमुख यांनी यावेळी सांगितले.

जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे संघाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, तसेच वकील बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि संघटनेच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास विधी क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!