आयआयटी मुंबईतील मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे भरा; राजकुमार बडोले यांची मागणी; साहिल वाकोडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या संचालकांशी चर्चा; संस्थात्मक चौकशी पारदर्शक करण्याची मागणी

साहिल वाकोडे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या संचालकांशी चर्चा करताना आमदार राजकुमार बडोले यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासह विद्यार्थी कल्याण, तक्रार निवारण व्यवस्था आणि संस्थात्मक चौकशी पारदर्शक करण्याची मागणी केली.

आयआयटी मुंबईतील १,२२५ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ७४२ पदे भरली असून मागासवर्गीय प्राध्यापकांची रिक्त पदे विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील प्राध्यापकांची दीर्घकाळापासून रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. या प्रवर्गातील प्राध्यापकांचे संस्थेत पुरेसे प्रतिनिधित्व वाढल्यास वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, संवाद आणि आवश्यक संस्थात्मक आधार मिळण्यास मदत होऊ शकते, असे बडोले यांनी म्हटले आहे.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राजकुमार बडोले यांनी बुधवारी आयआयटी मुंबईच्या संचालकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्राध्यापकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कल्याणकारी सुविधा, वसतिगृह व्यवस्था, तक्रार निवारण यंत्रणा, समुपदेशन तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित बाबींचा आढावा घेण्यात आला.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यूशी संबंधित संस्थात्मक बाबींची चौकशी करताना त्यांच्या कुटुंबीयांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळावी, तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे, पुरावे आणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!