जागरूक नागरिक, सुरक्षित समाज आणि सुरक्षित डिजिटल लातूर या संदेशातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा Cyber Warriorsचा प्रयत्न.
लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत बदलत जाणारे सायबर गुन्हे यामुळे नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या Cyber Warriors यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बस्तेवाड यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान नेहल बुलानी, नम्रता तौर, साहिल यादव आणि कृष्णा पांढरे यांनी Quick Heal Foundation यांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध सायबर जनजागृती उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी सायबर फसवणूक, ऑनलाइन आर्थिक गुन्हे, OTP व UPI फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, डिजिटल गोपनीयता आणि सायबर बुलिंग यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
Cyber Warriors यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी घेतलेल्या सायबर जनजागृती सत्रांची माहिती देतानाच शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध समुदायांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही दिली.
डॉ. भारत बस्तेवाड यांच्यासोबत झालेला संवाद Cyber Warriors साठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करावी, यावर या भेटीत भर देण्यात आला.
Quick Heal Foundation यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या सायबर जनजागृती अभियानातून “जागरूक नागरिक, सुरक्षित समाज आणि सुरक्षित डिजिटल लातूर” हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न Cyber Warriors कडून करण्यात येत आहे.
“सायबर सुरक्षा ही केवळ तंत्रज्ञानाची जबाबदारी नाही; ती प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे!”

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
