अमळनेरमध्ये दुर्दैवी घटना : गावठी कट्टा हाताळताना तरुणाचा मृत्यू: Unfortunate incident in Amalner

अमळनेर- येथील शाह आलम नगर परिसरात शनिवारी दि. 27 रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या आशा सुरेश महाजन यांच्या मुलगा अरुण सुरेश महाजन याचा गावठी कट्टा हाताळताना चुकून गोळी लागून मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन हा घरी असताना त्याच्या हातात गावठी बनावटीचा कट्टा होता. तो हाताळत असताना अचानक गोळी सुटली आणि ती त्याला लागली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक) व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना अपघाती आहे की इतर कोणता मुद्दा आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे मळनेर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#amalner #sthaniksamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!