नांदुरा अर्बन बँकेत आर्थिक गैरव्यवहार आणि जातीय भेदभावाचा आरोप; RBI आणि आयोगाकडून चौकशी, मोठ्या कारवाईची शक्यता
बुलढाणा : नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे तब्बल ५.७१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा आणि जातीय भेदभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ बौद्ध समाजातील सभासदांना लक्ष्य करून त्यांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बँकेतील भ्रष्ट संचालकांनी पदाचा गैरवापर करून सभासदांचे शेअर्स बळकावल्याचा तसेच त्यांना मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी गंभीर दखल घेत बुलढाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.
तक्रारीनुसार, बँकेतील काही भ्रष्ट संचालकांनी बौद्ध सभासदांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करत खोट्या नोटिसा पाठवल्या, तसेच आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला ‘आर्थिक दहशतवाद’ असे संबोधले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तक्रारदार आणि पत्रकार यांचा सातत्याने छळ केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून योग्य तपास न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची दखल आता भारतीय रिझर्व्ह बँक ने घेतली असून, दोन अधिकृत तक्रारींच्या आधारे बँकेच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदार किशोर इंगळे यांनी इशारा दिला आहे की, “जर आयोगाच्या नोटिशीनंतरही कारवाई झाली नाही, तर प्रकरण उच्च न्यायालय व केंद्रस्तरावर नेण्यात येईल. हे केवळ आर्थिक नाही तर जातीय छळाचे प्रकरण आहे.”
या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा प्रशासन आणि बँक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
