जळगाव शहरातील आर.एल. ज्वेलर्स परिसरात कारागिरावर हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
जळगाव शहरातील सराफा बाजार परिसरात चांदीच्या कारागिराला इलेक्ट्रिक शॉक देऊन बेशुद्ध करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजता घडली असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत वसंत भामरे (वय ४१, रा. आर.एल. कॉलनी, साईबाबा मंदिराजवळ, गांधी नगर, जळगाव) हे चांदीचे कारागीर असून ते बालाजी पेठ, रथ चौक परिसरातील ‘आर.एल. ज्वेलर्स’ शोरूमच्या मागील इमारतीत काम करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी भरत भामरे हे नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना एका अज्ञात व्यक्तीने इमारतीत प्रवेश केला. त्याने जवळील काळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक शॉक देणाऱ्या उपकरणाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भामरे यांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्याने चोरट्याचा डाव फसला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर भामरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
