निर्वाण फाउंडेशन व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘पाडा केअर’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

निर्वाण फाउंडेशन आणि अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाडा केअर’ आरोग्य शिबिरात नागरिकांची रक्त तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अंतुर्ली येथे ‘पाडा केअर’ आरोग्य शिबिर संपन्न झाले. डॉ. सैलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली.

दुर्गम व वंचित भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने निर्वाण फाउंडेशन आणि अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘पाडा केअर इनिशिएटिव्ह’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि संभाव्य आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य शिबिरात अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सैलेश पाटील आणि त्यांच्या आरोग्य पथकाने सक्रिय सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय सल्ले देण्यात आले. तसेच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात पवन बोदडे, बावसकर, अनीता पेंढोर, वंदना साळुंखे, रंजना पाटील, आनंदी मेढे, सुनीता सवाकरे आणि दीपक दुटे यांनी विशेष योगदान दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहकार्य केले.

आरोग्य सेवा दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पाडा केअर’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिबिरादरम्यान नागरिकांनी आरोग्यविषयक शंकांचे निरसन करून घेतले तसेच अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.

निर्वाण फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल किशोर मेढे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने निर्वाण फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही विविध लोकहितकारी आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या शिबिराच्या आयोजनासाठी आशिष मेढे, अक्षय मेढे, आर्यन मेढे, उदय मेढे आणि अभय शिरतुरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समाजोपयोगी आणि प्रभावी उपक्रम ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!