महसूल विभागातील उल्लेखनीय कार्यासाठी मुक्ताईनगरच्या तीन अधिकाऱ्यांचा जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव; वाचा सविस्तर बातमी.
महसूल दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये मुक्ताईनगरचे तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.
तहसीलदार गिरीश वखारे यांना ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेती पीक नुकसानीची आर्थिक मदत थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यक्षम व्यवस्था तसेच महसूल विभागातील सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टरीत्या पार पाडल्याबद्दल तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेत दिलेल्या प्रभावी सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच ग्राम महसूल अधिकारी निलेश काळे यांचा निवडणूक कामकाजातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तिन्ही अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, आमदार नंदकिशोर महाजन यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसांत पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
