जळगावातील मू. जे. महाविद्यालयात नशामुक्त समाजाच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, गीतगायन व पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
मूळजी जेठा महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘मेरा युवा भारत’, जळगाव, कान्ह ललित कला केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात जिल्हास्तरीय गायन, भाषण, संगीत, चित्रकला आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
भाषण स्पर्धेत कुमारी ऐश्वर्या पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर गीतगायन स्पर्धेत कुमारी रसिका ढेपे हिने तृतीय स्थान मिळविले. तसेच महाविद्यालयाच्या पथनाट्य संघानेही प्रभावी सादरीकरण करत तृतीय क्रमांकावर नाव कोरले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे यांनी विकसित भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका आणि नशामुक्त समाजाची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ‘मेरा युवा भारत’चे जळगाव जिल्हा संयोजक अभिषेक चवरे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देत पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना स्वतः नशामुक्त राहण्याबरोबरच समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाला के.सी.ई. सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्राचे सांस्कृतिक संचालक शशिकांत वडोदकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो.ची विद्यार्थिनी कुमुदिनी झा हिने केले, तर आभार प्रदर्शन कमलेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोनाली शर्मा आणि नितीन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
