जळगाव, दि. २० मार्च – जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने शहरातील काव्यरत्नावली चौक येथे ४०० परळ (पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची भांडी) वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांना भासत असलेल्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना आपल्या घराजवळ, गच्चीवर किंवा अंगणात परळ ठेवून चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात आमदार राजूमामा भोळे यांनी चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, नगरसेवक नितीन बरडे, सदस्य डॉ. विनोद बाविस्कर तसेच वंदना मंडावरे, आशा मौर्य, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, राधिका पाटील, स्मिता पाटील, पूजा हिंगु, पूर्वी शाह, जानवी जगताप, गौरव वनरा, किशोर पाटील आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पाणी ठेवा, चिमण्या वाचवा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
