जळगाव शहरात अफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधन टंचाईच्या भीतीने वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा : Rumors cause rush at petrol pumps in Jalgaon city

जळगाव शहरात अफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधन टंचाईच्या भीतीने वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा

जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या राजकमल टॉकीज आणि झाशीची राणी पुतळा परिसरातील पेट्रोल पंपावर आज संध्याकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली असून, यामुळे वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

अफवेचा फटका: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर परदेशातील युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. याच अफवेला बळी पडून राजकमल टॉकीज शेजारील पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी केली

एलपीजीची टंचाई: दरम्यान, जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस पंपांवर गॅसचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील ५ एलपीजी पंप बंद असल्याने रिक्षाचालकांना मोठा फटका बसला असून, हीच परिस्थिती पेट्रोलबाबतही ओढवेल या भीतीने नागरिक धास्तावले आहेत.

वाहनधारकांच्या रांगा: दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगांमुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक नागरिक खबरदारी म्हणून आपल्या वाहनांनमध्ये जास्तीसचे पेट्रोल भरत आहे.

प्रशासनाचे स्पष्टीकरण:

राज्य सरकारने आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई भासणार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्या पेट्रोल पंपावर सुरळीत पुरवठा सुरू असून, केवळ अफवांमुळेच ही गर्दी झाल्याचे समोर आले आहे.

#rumors_in_jalgaon #sthanilsamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *