भीम आर्मी भारत एकता मिशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सतीश पवार यांची नियुक्ती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने सतीश पवार यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सतीश पवार हे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालत त्यांनी समाजातील अन्याय आणि असमानतेविरुद्ध आवाज उठवला आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सतीश पवार यांनी सांगितले की, “संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन.”
या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही जबाबदारी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरत आहे.
यासोबतच सतीश पवार यांच्यावर त्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांची प्रभारी जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत सतीश पवार यांचे अभिनंदन केले आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजकारण अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार सतीश पवार यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
✍️ स्वप्नील खिल्लारे, बुलडाणा -+91 99232 48180

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
