शनिमांडळ येथे श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त भाविकांची मोठी गर्दी

श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिमांडळ येथील श्री शनिमहाराज मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली; परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला

शनी अमावस्येनिमित्त शनिमांडळमध्ये भक्तांची मोठी गर्दी; मंदिर समितीकडून भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध.

शनिमांडळ येथे श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पहाटेपासून भाविकांनी श्री शनिमहाराज मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

श्री शनिमहाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून हजारो भाविक शनिमांडळ येथे दाखल झाले होते. अनेक भक्तांनी कुटुंबासह दर्शन घेत शनिदेवांच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. यावेळी श्री शनिदेवांना तेल अभिषेक, पुष्पहार अर्पण तसेच विशेष पूजा-अर्चा करण्यात आली. मंदिर परिसरात भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांकडून चहा,मराठीशाळेत भोजन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याचे पाणी, दर्शन रांग व्यवस्थापन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन तसेच स्थानिक युवकांनी विशेष सहकार्य केले. गर्दी असूनही संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.

व्यापाऱ्यांत उत्साह

शनी अमावस्येनिमित्त परिसरातील व्यापारी व लहान व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी सुरू होती.

स्थानिक ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!